आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक १ मे ला घोषित होणार !

आळंदी (पुणे) – येथील ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात महत्त्वाचे पालट घोषित केले आहेत. पूर्वी  घोषित केल्याप्रमाणे १३ एप्रिलला पालखी सोहळ्याचे वेळापत्रक येणार होते. ९ आणि १० एप्रिलला पुणे येथील भवानी पेठ येथील पालखी विठ्ठल मंदिरातील मुक्काम, तसेच सुविधा अन् नियोजनाविषयी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव निश्चित झालेला नसल्यामुळे संस्थान कमिटीने या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही. याविषयी पुढील ८ दिवसांत प्रशासनासमवेत बैठक आयोजित होणार असून सुधारित आराखडा निश्चित झाल्यानंतर २६ एप्रिलला दिंडी समाजासाठी सुधारित मार्ग घोषित केला जाणार आहे, तसेच १ मे या दिवशी आळंदी येथे आषाढी वारीची अधिकृत कार्यक्रम पत्रिका घोषित करण्यात येणार आहे.