
मुंबई – राज्य प्रशासन अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि कार्यक्षम बनवण्यासाठी २ ते ८ एप्रिल या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकार, ‘क्षमता विकास आयोग’ आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांच्या कौशल्यवृद्धीसाठी हे प्रशिक्षण आहे.
राज्यातील ३६ जिल्हे, ३२ विभाग आणि ६ विभागीय कार्यालयांतील अधिकारी अन् कर्मचारी यांत सहभागी होणार असून त्यांच्या कामाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आणि कार्यपद्धती ते आत्मसात करणार आहेत. ‘डिजिटल गव्हर्नन्स’ला चालना देणे, वेळ व्यवस्थापन सुधारणे, तसेच नागरिककेंद्रित सेवा अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !