युरोपमधून ड्रोन मागवून म्यानमारमधील आतंकवाद्यांना करत होते पुरवठा !

नवी देहली – भारताविरुद्ध आतंकवादी कारवायांचा कट रचल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यामध्ये युक्रेनचे ६ आणि अमेरिकेचा १ नागरिक यांचा समावेश आहे. त्यांना लक्ष्मणपुरी, देहली आणि कोलकाता विमानतळांवरून अटक करण्यात आली.
🚨 NIA cracks down on international terror plot against India 🇮🇳
7 foreign nationals arrested – including 6 Ukrainians 🇺🇦 and 1 American 🇺🇸
⚠️ A worrying shift: Terror activities in India are no longer limited to Pakistan-linked elements – global actors now emerging
⚖️ Only… pic.twitter.com/RrdW5l9igR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 18, 2026
मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनीही विधानसभेत सांगितले की, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक परदेशी नागरिक मिझोराममार्गे म्यानमारमध्ये जाऊन आतंकवाद्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देत आहेत. यांपैकी काही जण रशिया-युक्रेन युद्धात सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे.
ड्रोन पुरवठा आणि बंडखोरांशी संपर्क
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या माहितीनुसार हे लोक युरोपमधून मोठ्या प्रमाणावर ड्रोन मागवून भारताच्या मार्गे म्यानमारमधील बंडखोर गटांना पुरवठा करत होते, जे भारतातील आतंकवाद्यांना साहाय्य करतात. सर्व संशयित वैध व्हिसावर भारतात आले होते; मात्र आवश्यक ‘प्रतिबंधित क्षेत्र परवाना’ नसतांना ते मिझोराममध्ये पोचले. तेथून त्यांनी सीमा ओलांडून म्यानमारमध्ये भारतविरोधी वांशिक गटांशी संपर्क साधला.
पटियाला हाऊस न्यायालयाने कटाची व्याप्ती आणि आर्थिक पुरवठ्याचे स्रोत शोधण्यासाठी संशयितांची कोठडी २७ मार्चपर्यंत वाढवली आहे. यंत्रणा आता त्यांचे भ्रमणभाष आणि सामाजिक माध्यम खाती तपासत असून भारतात लपलेल्या त्यांच्या इतर साथीदारांसमवेतच परदेशी सूत्रधारांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाआतापर्यंत पाकिस्तानी आतंकवादी भारतात कारवाया करत होते; मात्र आता अन्य विदेशीही कारवाया करत असल्याने भारताने आता अशांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !