|
– श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, मुंबई.

मुंबई – मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांमुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली असून यामुळे ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढले आहेत. बांगलादेशी घुसखोरांमुळे मुंबईच्या पारंपरिक व्यवसाय आणि सुरक्षा यांवर परिणाम होत आहे. हे बांगलादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंना त्यांच्याच घरातून बाहेर काढत आहेत. हा विषय अत्यंत ज्वलंत असून मुंबईसह राज्याला बांगलादेशीमुक्त करण्यासाठी सरकार आता कठोर पावले उचलणार का ? अशा प्रश्नांचा भडीमार करून विरोधी आणि सत्ताधारी आमदारांनी सरकारला धारेवर धरले. या वेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी लवकरच ‘विशेष कृती दल’ (स्पेशल टास्क फोर्स) स्थापन करण्यात येईल, तसेच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (शोधमोहीम) राबवून घुसखोरांना शोधून काढले जाईल, अशी माहिती दिली.
मुंबईतील वाढती घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाविषयीची लक्षवेधी २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली. या वेळी त्यांनी मुंबईची सुरक्षा आणि हिंदूंचे हक्क यांविषयी सरकारचे लक्ष वेधले.
घुसखोरांचा ‘भूमी जिहाद’ आणि वाढती असुरक्षितता !
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन सूचीमध्ये घुसखोर मोठ्या संख्येने समाविष्ट केले जात आहेत. २३७ बांगलादेशींना जन्मदाखले कसे मिळाले ?, तसेच डोंगरी किल्ला, मालवणी, चेंबूर यांसारख्या भागांत बांगलादेशी घुसखोरांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. विशिष्ट समुदायाची (मुसलमानांची) लोकसंख्या वाढवून मुंबईचे वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांनी फेरीवाला व्यवसायातून सार्वजनिक जागा, पदपथ, बाजारपेठा कह्यात घेतल्या आहेत. ‘फेरीवाला जिहाद’चे (‘हॉकर्स जिहाद’चे) प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात वाढू लागले आहे. भाजी मंडई, मासळी बाजार, दूध वितरण, फळविक्रेते, पदपथावरील लघुउद्योग, छोटी उपाहारगृहे, किराणा दुकाने, पादत्राणे व्यावसायिक, लोहार काम करणारे, मातीची भांडी बनवणारे, सुतारकाम करणारे, केस कापणारे, कपडे शिवणारे यांसारखे अनेक पारंपरिक व्यवसाय करणारे बहुसंख्य हिंदू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मुंबई येथील समुद्र किनारपट्टीवर बांगलादेशी मुसलमानांच्या वस्त्या उभारल्या आहेत. दक्षिण मुंबई येथे समुद्रकिनारी अवैध छोटे मोठे दर्गे बांधण्यात आले आहेत. आजूबाजूला बांगलादेशी घुसखोरांच्या झोपडपट्ट्या वसवण्यात आल्या आहेत. ‘या दर्ग्यांचा वापर अवैध घुसखोर मुंबई येथे स्थिरस्थावर करण्यासाठी केला जात आहे’, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गोवंडी येथून पकडलेले ८ किन्नर हे बांगलादेशी घुसखोर होते. अनेक बांगलादेशी घुसखोरांकडून बनावट जन्मप्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शिधापत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. अशा घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आणि संतापाची भावना आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची मोहीम तीव्र करावी, अशी त्यांनी मागणी केली.
या वेळी सदस्य शशिकांत शिंदे म्हणाले की, राजकीय पाठबळाविना हे घुसखोर पदपथावर धंदा करू शकत नाहीत. मतांच्या राजकारणासाठी ही यंत्रणा पोखरली गेली आहे. अनधिकृत वस्त्यांवर बुलडोझर चालवून त्यांना कायमचे बाहेर काढावे.

एका वर्षांत २ सहस्र ३०० बांगलादेशी घुसखोर हद्दपार ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, वर्ष २०२५ पासून ते आतापर्यंत २ सहस्र ३०० हून अधिक बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील घुसखोरांना शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील घुसखोरांना पकडण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ जणांचे ‘विशेष पथक’ नेमले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्यशासन निधीची कमतरता पडू देणार नाही. स्थानिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. इमारतीची बांधकामे, मासेविक्रेते, पदपथ, भाजी मंडया, किराणा दुकाने, तसेच समुद्राकाठवरील झोपडपट्ट्या येथे संबंधित पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, आतंकवादविरोधी पथक यांच्याद्वारे प्रत्यक्ष शोध चालू असून बांगलादेशी घुसखोर नागरिक आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे.
राजकीय आरोप नको, घुसखोरमुक्त शहर करा ! – अनिल परब, आमदार, ठाकरे गट
हा केवळ सुरक्षेचा प्रश्न आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चालणारे कपड्यांचे कारखाने आणि अनधिकृत वस्त्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर ठाण मांडून बसले आहेत. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता खर्या अर्थाने एक विशेष कार्यदल स्थापन करून हे घुसखोर ३ महिन्यांत बाहेर काढावेत. विशेष म्हणजे पोलिसांना हे घुसखोर कुठे आहेत ? याची पूर्ण माहिती असते. त्यांना सांगितले, तर २ दिवसांत सर्व बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात येईल.
घुसखोरांकडे असलेली कागदपत्रे रहित करण्यासाठी यंत्रणा उभारा ! – डॉ. मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना
अपर पोलीस महासंचालकांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून बांगलादेशी घुसखोर यांनी प्राप्त केलेली कागदपत्रे रहित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांकडे असलेल्या शिधापत्रिका, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे यांची पडताळणी करून ती रहित करण्याची यंत्रणा उभी करावी.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !