आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता : पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्‍या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.

नाकात तूप आणि कानात तेल का घालावे ?

नस्य केल्याने मेंदूला शक्ती मिळते. डोकेदुखी, खांदेदुखी, केस गळणे किंवा पांढरे होणे, दोन नाकपुड्यांमधील पडदा (Nasal septum) एका कडेला सरकणे, दमा, जुनाट सर्दी, जुनाट खोकला यांसारख्या विकारांमध्ये, तसेच मानेच्या वरच्या भागाच्या आरोग्यासाठी प्रतिदिन नस्य करणे लाभदायक आहे.

आयुर्वेद हे विलंबाने नव्हे, तर लगेच गुण देणारे शास्त्र !

बहुतेक वैद्य रुग्णाची प्रकृती, रोगाची कारणे इत्यादींचा विचार न करता अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदीय उपचार करत (चिकित्सा देत) असल्याने आणि रुग्णही पथ्ये इत्यादी नीट पाळत नसल्याने ‘आयुर्वेदीय औषधांनी विलंबाने गुण येतो’, हा अपसमज रूढ झाला आहे.’

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

एप्रिल आणि मे या दोन मासांचा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. शरिराची शक्ती, तसेच पचनशक्तीही न्यून झालेली असते. या काळात नाकातून रक्तस्राव होणे (घुळणा फुटणे), उन्हाळे लागणे (लघवीला जळजळ होणे), घामोळे येणे, उष्माघात, डोळे येणे आदी विकार होतात.