रावेर (जळगाव) येथे ४१ गायी घेऊन जाणारा कंटेनर पकडला : ६ गायी मृत

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात एका कंटेनरमधून निर्दयीपणे गायींची वाहतूक होत असल्याची माहिती जिल्ह्यातील रावेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या कंटेनरचा पाठलाग करत त्यास विवरा गावाजवळ पकडले.

कोरोना चाचणी न करता केलेल्या शस्त्रक्रियांमुळे ३८ टक्के रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याविषयी चाचणी न करता शस्त्रक्रिया केल्याने ५१ टक्के रुग्णांच्या फुप्फुसात गुंतागुंत निर्माण झाली. त्यापैकी ३८ टक्के रुग्णांचा मृत्यूही झाल्याचे ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

कोल्हापूर येथे चाकूने आक्रमण केल्याच्या प्रकरणी निलंबित पोलीस ‘कॉन्स्टेबल’सह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

असे गुंड प्रवृत्तीचे पोलीस समाजात कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? अशांवर कठोर कारवाईच अपेक्षित आहे !

आजरा येथे चीनच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि होळी

भारतीय जनता पक्ष, आजरा गावातील प्रमुख तालीम आणि मंडळे यांच्याकडून चीनच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. चिनी आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी मालाचा स्वीकार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

भाजपचे पीककर्ज वाटपासाठी ‘राज्यव्यापी’ आंदोलन चालू

पावसाळा चालू होऊनही खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना अद्यापही पीककर्ज वाटप न केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे हे कर्जवाटप लवकर चालू करण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

मृग नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्याने यंदा सोलापूर जिल्ह्यात खरिपाच्या ४९ टक्के पेरण्या पूर्ण

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच भागांत अल्प-अधिक प्रमाणात मृगाचा चांगला पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या एकूण २ लाख ३४ सहस्र हेक्टरमधील आतापर्यंत १ लाख ३६ सहस्र हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली.

२२ जून या दिवशी महाराष्ट्रात ३ सहस्र ७२१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले

२२ जून या दिवशी कोरोनामुळे महाराष्ट्रातील ६२ नागरिकांचा मृत्यू झाला असून कोरोनाचे ३ सहस्र ७२१ नवीन रुग्ण सापडले.

पुण्यात एकाच दिवसात सर्वाधिक ६२० कोरोनाबाधित रुग्ण सापडले

२१ जून या दिवशी येथे सर्वाधिक ६२० कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १२ सहस्र ४७४ एवढी झाली होती. २२ जून या दिवशी पुन्हा नव्याने ५२४ रुग्ण सापडले असून, एकूण रुग्ण संख्या १५ सहस्र ९४२ झाली आहे.

बुर्ली (जिल्हा सांगली) पाणीपुरवठा अपहाराच्या प्रकरणी अभियंत्याला अटक

शासनाच्या योजनांत सर्रास भ्रष्टाचार चालू आहे. यामुळे सामान्य जनता रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. भ्रष्टाचार्‍यांना तात्काळ आणि कठोर शासन मिळाले, तरच या प्रकारांना आळा बसेल, हे केव्हा लक्षात घेणार ?

जयसिंगपूर येथे भ्रमणभाषच्या कारणावरून झालेल्या वादातून १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

धर्मशिक्षणामुळे साधनेचे महत्त्व कळते. साधना आचरणात आणल्याने कठीण प्रसंग, राग, अपमान यांच्यावर मात करता येऊन स्थिर रहाता येते. त्यामुळे शालेय शिक्षणात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणे अत्यावश्यक आहे, हेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या दर्शवतात !