येणार्‍या काळात एन्.जी.ओ.ना मोठ्या संधी असणार ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.

ठाणे कारागृहातील कर्मचार्‍याला कोरोनाची लागण

ठाणे मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे.

चिनी आस्थापनांसमवेतचे करार रहित केलेले नसून स्थगित ठेवले आहेत ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

सध्याच्या वातावरणात केंद्रशासनाकडून स्पष्ट धोरण घोषित होण्याची वाट पहाण्यात येईल. हे करार रहित करण्यात आलेले नाहीत, तूर्तास स्थगित ठेवण्यात आले आहेत. यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नागपूर येथून १ कोटी ४७ लाख रुपये किमतीचा खाण्यास अयोग्य असलेला सुपारीचा साठा जप्त

शहरात काही व्यावसायिकांकडून न्यून दर्जाची आणि खाण्यास अयोग्य असलेल्या सुपारीची सर्रास विक्री होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती.

रत्नागिरीत कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी

जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २१ बळी झाले आहेत. २२ जून या दिवशी मृत्यू झालेल्या शिरगाव (चिपळूण) येथील रुग्णाला किडनीचा आणि मधुमेहाचा आजार होता.

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या गणपतीपुळेतील ३ हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा नोंद

कोरोना महामारीसाठी जिल्ह्यात आपत्कालीन, तसेच साथरोग नियंत्रण कायदा लागू आहे. जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांना विनाअनुमती हॉटेलमध्ये रहाण्यास दिले, या कारणास्तव गणपतीपुळे परिसरातील ३ हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यात एका दिवसात ६०० हून अधिक कोरोनाबाधित आढळले

२१ जून या दिवशी जिल्ह्यात ६०० हून अधिक कोरोनाबाधित आढळले, तर १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५ सहस्र ८८१ एवढी झाली आहे

सैन्यदलाचा गणवेश आणि बनावट ओळखपत्र यांद्वारे फसवणूक करणार्‍या बडतर्फ सैनिकाला नगर परिसरातून अटक

सैन्यदलाचा गणवेश आणि बनावट ओळखपत्र यांद्वारे फसवणूक करणार्‍या प्रशांत भाऊराव पाटील या बडतर्फ सैनिकाला अटक करण्यात आली असून त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. गुप्तचर विभाग आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा यांनी नगर शहराजवळ ही कारवाई केली.

पंतप्रधान साहाय्यता निधी माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यासाठी शिवाजीनगर (पुणे) न्यायालयात याचिका

पंतप्रधान साहाय्यता निधी माहिती अधिकाराच्या कक्षेत यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश बजाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आय) राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

मिरज येथे भाजपच्या वतीने हुतात्मा भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने

भाजपचे आमदार श्री. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीने हुतात्मा भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.