सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !

‘भ्रष्टाचार नाही’, असे एकही क्षेत्र नाही. सदनिका घ्यायची असली, तरी रोख (काळा पैसा) आणि धनादेश यांद्वारे रक्कम द्यावी लागते. सदनिका विकणार्‍या ५-१० जणांचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली की, सर्वच सदनिका-विक्रेते काळ्या पैशांतील व्यवहार तात्काळ थांबवतील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पोलिसांनी हे लक्षात घ्यावे !

‘पोलिसांना ‘जनता आपली मुले आहेत’, असे वाटले पाहिजे, तरच त्यांच्याकडून नोकरी योग्य तर्‍हेने होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पू‍र्वीचे राजे आणि आजचे शासनकर्ते यांच्यातील भेद !

‘पूर्वी राजाला प्रजा पुत्रवत वाटत असे. आता लोकशाहीत ‘शासनकर्ते प्रजेला लुबाडण्यासाठी आहेत’, असे वाटते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांचे नेते आणि देवाचे भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे  शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !

‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼ हाच मार्ग !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बहुतांश राजकीय पक्ष जनताद्रोही !

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे आणि देशाचे भले व्हावे म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्यासंदर्भात ते काही करतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि त्यावरील उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, स्वरक्षणार्थ तरी भग‍वंताची उपासना करा !

‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले