गुरूंचे महत्त्व !

‘आपल्या आई-वडिलांनी किंवा शिक्षकांनी लहानपणी मुलांना अ, आ, इ… हे शिकवले नसते, तर मुलांना पुढे शिकता आले नसते. त्याप्रमाणे अध्यात्मात गुरु आपल्याला जे शिकवतात, ते पुढे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आधुनिक विज्ञानापेक्षा श्रेष्ठ हिंदु धर्मग्रंथ !

हल्ली विज्ञानाने जे शोध लावले, त्यांचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लावला होता. त्यांचा उल्लेख वेद, उपनिषदे, पुराणे यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये केलेला आहे. या ग्रंथांमध्ये अजूनही अनेक वैज्ञानिक सूत्रे सांगितलेली आहेत, की ज्यांच्यापर्यंत आधुनिक विज्ञानाला पोचता आलेले नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद !

विज्ञानाने स्वार्थीपणा वाढू शकतो, तर अध्यात्मात साधनेने स्वार्थीपणा नाहीसा होतो – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैज्ञानिक आणि संत !

वैज्ञानिक स्थुलातील गोष्टींचे संशोधन करतात, तर संत सूक्ष्मातील गोष्टी जाणतात आणि काही प्रसंगी त्यावर अधिकारही मिळवतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रेष्ठ कोण – माणूस कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुट्टी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले,

साधनेच्या संदर्भात नुसते प्रश्न विचारू नका, तर कृती करा !

‘साधनेसंदर्भात काही जण नुसते प्रश्न विचारत असतात, कृती काहीच करत नाहीत. त्यांनी लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन यांचे पुढील सुवचन लक्षात ठेवून साधना करावी. ‘का आणि कसे ?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारत बसू नका, तर कार्यात स्वतःला झोकून द्या आणि वेळप्रसंगी सर्वस्वही अर्पण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे जाणा !

काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा व्यर्थ अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सात्त्विक व्यक्तींच्या जीवनाचे अंतिम ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगामी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे वैशिष्ट्य !

‘जगातील सर्वच महाविद्यालयांत आणि विश्वविद्यालयांत मायेतील विषयांचे शिक्षण दिले जाते. याउलट ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात’ १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमांतून ‘मायेतून मुक्ती कशी मिळवायची’, याचे शिक्षण देण्यात येणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले