पालटत्या काळाचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या भावविश्‍वात सुंदर चित्र उभे करत त्यांचे प्रबोधन करणारे अभिनंदनीय आणि वंदनीय ‘बालसंस्कार वर्ग’ !

प्राध्यापक श्रीकांत बेलसरे हे मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. शंभराव्या बालसंस्कार वर्गाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

ब्राह्मण समाजाच्याही अडचणींना वाचा फोडणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पेशवा युवा मंच’कडून आभार !

व्यापक हिंदुत्वाचा विचार करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ने ब्राह्मण समाजाच्या काही अडचणींविषयी जी सहानुभूती दर्शवली, त्याविषयी आम्ही ‘पेशवा युवा मंच’ आणि समस्त ब्राह्मण समाज यांच्या वतीने आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहोत.

देवता आणि हिंदु जनता यांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करायला हवा !

‘सातत्याने हिंदूंच्या देवतांवर आक्षेपार्ह टिपण्या करणारा आणि एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याला धडा शिकवणार्‍या हिंदूरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! समाजाला योग्य दृष्टीकोन देण्यासाठी अशा संघटनांची आवश्यकता आहे.

वेतन आयोगापासून वंचित कर्मचारी !

वेतन संरचनेच्या मागील आकडेवारीनुसार ४ था वेतन आयोग वर्ष १९८६, ५ वा वेतन आयोग वर्ष १९९६, ६ वा वेतन आयोग वर्ष २००६, तर ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून सर्व शासकीय कर्मचार्‍यांना लागू झाला; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अद्यापही ७ व्या वेतन आयोगापासून वंचित आहे.