श्री तुळजाभवानी मंदिरात ‘मास्क’ अनिवार्य !


तुळजापूर (प्रतिनिधी) –
राज्यात पुन्हा एकदा ‘कोरोना विषाणू’चा संसर्ग जाणवत आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि इतर राज्यांतून येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी मुखपट्टी (मास्क) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच समवेत नागरिकांनी सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर पाळणे यांचेही पालनही करावे, असे आवाहन मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी भाविक, पुजारी आणि नागरिक यांना प्रसिद्धपत्रकाद्वारे केले आहे.