Air Pollution : भारतातील १० शहरांमध्‍ये प्रदूषणामुळे प्रतिवर्षी होत आहे ३३ सहस्र लोकांचा मृत्‍यू !

नवी देहली – ‘लॅन्‍सेट’ जर्नलमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या अहवालानुसार देशातील शिमला, देहली, वाराणसी, कोलकाता, कर्णावती, मुंबई, पुणे, भाग्‍यनगर, बेंगळुरू आणि चेन्‍नई या शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे. या शहरात वायू प्रदूषणामुळे ७ टक्‍के मृत्‍यू होत असल्‍याचे समोर आले आहे. याचा अर्थ वायू प्रदूषणामुळे या शहरांमध्‍ये वर्ष २००८ ते २०१९ या काळात प्रतिवर्षी ३३ सहस्र लोकांना त्‍यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या कालावधीत या शहरांमध्‍ये नोंदवलेल्‍या एकूण मृत्‍यूंपैकी ही संख्‍या ७.२ टक्‍के आहे.

संपादकीय भूमिका 

हवामान प्रदूषणाची ही स्‍थिती शासनकर्त्‍यांना ठाऊक नाही का ? इतकी गंभीर स्‍थिती असतांना याविषयी ना शासनकर्ते काही करतरत ना जनता त्‍याविषयी त्‍यांना जाब विचारते ! ही स्‍थिती भारतियांना लज्‍जास्‍पद होत !