गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – तेरणी येथे एका मतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला असून युवती ७ महिन्यांची गर्भवती आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंब प्रचंड तणावाखाली असून हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपींकडून प्रयत्न करण्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांवर अधिकाधिक कडक कारवाई करावी आणि पीडितेच्या साहाय्यतेसाठी सर्वोत्तम सरकारी अधिवक्ता देण्यात यावा, या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन शिरस्तेदार विष्णु बुट्टे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सागर कुराडे, बजरंग दलाचे श्री. विश्वनाथ पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे श्री. आप्पा शिवणे, भाजप विस्तारक आणि सरचिटणीस श्री. संदीप नाथबुवा, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. अशोक शिंदे, सर्वश्री अमर पोटे, प्रकाश परीट, संजय मुरुकटे, दीपक भादवणकर, संदीप रोटे, डॉ. संतोष पेडणेकर, अर्चना रिंगणे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर यांसह अन्य उपस्थित होते.