१. ‘श्रीरामाला सतत आळवून त्याची मूर्ती अंतरात्म्यात आणि पेशीपेशीत स्थापन करूया’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात सांगणे अन् साधकांमधील श्रीरामाचे तत्त्व जागृत करणे
‘११.१.२०२४ आणि १८.१.२०२४ या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगात ‘श्रीरामाला सतत आळवून त्याची मूर्ती आपल्या अंतरात्म्यात आणि पेशीपेशीत स्थापन करूया’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले. त्यांनी साधकांमध्ये श्रीरामाचे तत्त्व आणि चैतन्य जागृत केले. त्या स्वतः श्रीराम प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला अयोध्येत उपस्थित राहून आल्या होत्या. त्यांनी भक्तीसत्संगात साधकांच्या अनुभूतीतून आणि अयोध्येतील वर्णन सांगून तो सोहळा प्रत्यक्ष साकार केला.
२. श्रीरामाची स्तुती भावपूर्ण वाणीतून, तसेच ‘गायन आणि नामजप’ यांच्या माध्यमांतून संपूर्ण वातावरण आणि साधक यांना राममय करणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !
श्रीरामाची स्तुती, गायन आणि नामजप या माध्यमांतून त्यांनी संपूर्ण वातावरण आणि सर्व साधक यांना राममय केले. प.पू. गुरुदेवांवरील (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील) त्यांच्या भक्तीमुळे ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी दोन घंटे घेतलेला भव्य, दिव्य असा भक्तीमय सत्संग हा कलियुगात त्यांचे ज्ञान आणि त्याग यांचे प्रतीक असल्याची प्रचीती देत आहे’, असे मला वाटले. प.पू. गुरुदेवांना संपूर्णतः स्वतःला अर्पण करणारेच हे करू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. माझा त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना घडवणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नंदिनी पोकळे (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (७.२.२०२४)