श्री. गुरुदत्त सखदेव यांना रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्री. गुरुदत्त सखदेव

१. ‘रथोत्सव पाहिल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) दर्शन अगदी अल्प काळ झाले, तरी मनाला आनंद जाणवला.

२. रथ रामनाथी आश्रमातून बाहेर जात असतांना मन पूर्णपणे निर्विचार झाले होते. त्यानंतर भावजागृती टिकून होती आणि मन आनंदी होते.

३. रथ पुन्हा आश्रमात आल्यावर मनात कोणतेच विचार आले नाहीत. त्याही वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन अधिक वेळ झाले नाही; पण मन प्रसन्न होते.

४. हे सर्व पाहून आणि अनुभवून ‘जन्माचे सार्थक झाले’, असे मला वाटले. मनाची ही अवस्था रात्रीपर्यंत टिकून होती.’

– श्री. गुरुदत्त सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२२)