महाड येथे धर्मांधांकडून पोलिसांसमोर ४ गोरक्षकांवर आक्रमण !

१ जण गंभीर घायाळ !

(प्रतिकात्मक चित्र)

महाड – येथील इसाने कांबळे भागात गोवंशियांची हत्या करणार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले. संबंधित ठिकाणी गोहत्या होणार असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षकांना मिळाली होती. त्यामुळे ते घटनास्थळी पोचले आणि गोहत्या करणार्‍यांना रंगेहात पकडले. या वेळी पोलीसही गोरक्षकांसमवेत होते; पण तरीही धर्मांधांनी गोरक्षकांना बेदम मारहाण केली. यात श्री. दिनेश दरेकर यांना गंभीर दुखापत झाली असून सर्वश्री सुमित दरेकर, जयेश जगताप आणि सागर साळुंखे किरकोळ घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करू न शकणारे पोलीस कधी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करू शकतील का ? अशा पोलिसांना बडतर्फच केले पाहिजे !