२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
केरळमध्ये हिंदु धर्माच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र रोखण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !
१. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवर बंदी
‘केरळमध्ये हिंदूंची स्थिती अत्यंत शोचनीय आहे. तेथे मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे केरळ दुसरे काश्मीर होण्याकडे वाटचाल करत आहे. पूर्वी केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुष्कळ शाखा चालायच्या. आता तेथे सार्वजनिक ठिकाणी शाखा चालवू देत नाहीत. त्यामुळे त्या मंदिरात घेतल्या जात होत्या. त्यानंतर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोणत्याही मंदिरात शाखा चालवायची नाही’, असा आदेशच केरळ सरकारनेे काढला. त्यामुळे आता मंदिरात चालणार्या शाखाही बंद होण्याची वेळ आली आहे.
२. केरळमध्ये धर्मांधांचा ‘नशेच्या औषधांचा जिहाद’
सप्टेंबर २०२३ मध्ये ‘पी.एफ्.आय.’(पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया) या धर्मांध संघटनेवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणांवर धाडी घातल्या गेल्या. त्यांचे अधिकोशातील खातेही गोठवण्यात आले. त्यामुळे त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यात अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी ‘ड्रग्ज जिहाद’ (अमली पदार्थ जिहाद) चालू केला आहे. हा नशेच्या औषधांचा जिहाद आहे. सर्व हिंदु मुलांना नशेची औषधे देण्याचे त्यांचे ध्येय आहे. शाळेत जाणार्या लहान लहान मुलांना स्वस्तात १०० रुपयांमध्ये नशेची औषधे विकली जात आहेत. व्यक्तीच्या मेंदूवर या औषधांचा परिणाम १० घंट्यापर्यंत रहातो. आपल्याला ठाऊक असेल की, मागे येथे १ लाख कोटी रुपयांची नशेची औषधे पकडली गेली होती. ही औषधे अफगाणिस्तानहून एका मोठ्या जहाजातून येत होती. त्याला केरळमध्ये पकडण्यात आले. त्यांचे लक्ष्य केरळ होते. लक्षावधी कोटी रुपयांचे हे अमली पदार्थ केरळमध्ये पोचले असते, तर काय झाले असते, याची आपण कल्पना करू शकतो. याखेरीज तेथे उघडपणे ‘लव्ह जिहाद’ चालूच आहे. त्यांना काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. तेथे त्यांना थांबवणारे कुणी नाही. त्यामुळे या गोष्टी तेथे चालतच रहाणार आहेत.
३. केरळमधील हिंदु संस्कृती संपवण्याचे पुरोगाम्यांचे षड्यंत्र
अ. केरळमध्ये हिंदूंची संपूर्ण संस्कृती संपवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी शबरीमाला प्रकरण समजून घेऊया. त्यापूर्वी आपल्याला स्वामी अय्यप्पा यांच्याविषयी समजून घ्यावे लागेल. स्वामी अय्यप्पा यांना हरिहर सूत, म्हणजे हरि (विष्णु) आणि हर (शिव) यांचा मुलगा म्हटले जाते. त्यांचा कलियुगात अवतार होऊन गेला होता. दुर्गामातेने महिषासुराचा वध केला. त्यानंतर त्याच्या महिषी या बहिणीला पुष्कळ राग आला. तिने कठोर तपस्या केली. परिणामी ‘ती कोणत्याही स्त्रीच्या योनीतून जन्माला आलेल्या माणसाकडून मारली जाऊ शकत नाही’, असा तिला वर मिळाला. त्यामुळे ती पुष्कळ बलवान झाली. या काळातही पुष्कळ अधर्म चालला होता. तेव्हा भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला. ब्रह्मासुर आणि महिषी यांचा वध करणे, हा त्यांचा उद्देश होता. त्यानंतर परम शिव आणि मोहिनी यांच्या संगमातून भगवान अय्यप्पाचा जन्म झाला. अय्यप्पा स्वामी यांनी महिषीचा वध केला.
आ. त्यानंतर स्वामी अय्यप्पाने सांगितले, ‘माझे कर्तव्य संपले असून आता मी घोर तपस्या करायला जाणार आहे. त्यासाठी मला एक मंदिर हवे.’ अय्यप्पा हे एक कठोर ब्रह्मचारी होते. त्यामुळे ते म्हणाले, ‘माझ्या मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील कुणीही स्त्रिया येता कामा नये.’ हा नियम स्वतः स्वामी अय्यप्पाने बनवला आहे. त्यानंतर या मंदिराची निर्मिती झाली. हे मंदिर पुष्कळ शक्तीशाली आहे. तेथे जाऊन आपण श्रद्धापूर्वक काहीही मागितले, तर आपली इच्छापूर्ती होते.
इ. ‘इंडियन यंग लॉयर असोसिएशन, नवी देहली’, या संस्थेचा संस्थापक नौशाद आहे. त्याने एक खोटे कथानक चालवून हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले. स्वामी अय्यप्पा मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे ‘हा लिंगभेद नको, तर सर्वत्र समानता पाहिजे’, अशी त्यांची मागणी होती. षड्यंत्रानुसार ‘इंडियन यंग लॉयर असोसिएट’च्या ५ मुलींना सिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्यांनी न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला. त्यानंतर अय्यप्पा कर्मा समितीच्या अधिवक्त्यांनी त्यांना भेटून सांगितले. त्यानंतर त्यांच्यातील ३ महिलांनी खटल्यातून माघार घेतली. त्यानंतर आणखीही २ महिला शिल्लक होत्या. या प्रकरणाला प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात आली. हा केवळ लिंग समानतेचा खटला असून दुसरे काही नाही’, असे लोकांवर बिंबवण्यात आले.
ई. या खटल्याचा निवाडा हिंदूंच्या विरोधात गेला. त्यानंतर साम्यवादी सरकारकडून त्याला त्वरित कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या विरोधात केरळमधील हिंदू काही प्रमाणात संघटित झाले. त्यांनी ‘स्वामी शरणम् शरणम् शरणम् अय्यप्पा ।’ या नामजपसह आंदोलन केले. त्यानंतर केरळ सरकारकडून या आंदोलकांवर खटला प्रविष्ट झाला. त्यानंतर हा खटला दुसर्यांदा सर्वोच्च न्यायालयात केला.
४. केरळ सरकारला मंदिरांच्या संपत्तीचा अधिकार
केरळमध्ये ‘केरला हिंदु प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप अॅक्ट, १९६५’ आणला गेला. त्याद्वारे मंदिरांवर निर्बंध ठेवले आहेत. आपल्या कुटुंबात जर कुणाचा मृत्यू झाला, तर १४ दिवस आपण मंदिरात जात नाही, असा काही कायदा होता. तो कायदाही काढण्यात आला. त्यामुळे केरळमध्ये मंदिरे सार्वजनिक स्थळ बनले आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आता मंदिराची पूर्ण संपत्ती सरकारजमा करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आले. भगवंताचे मंदिर असते, त्या भगवंतासाठीही अधिकार आहेत. भगवंताचा हा अधिकारही एका निर्णयात काढण्यात आला. त्यामुळे आता मंदिराच्या संपत्तीचा अधिकार केवळ सरकारला मिळाला आहे.
५. ‘गुरुवायूर देवस्वोम समिती’कडून मुख्यमंत्री निधीसाठी ५ कोटी रुपयांचे साहाय्य
केरळमध्ये ‘गुरुवायूर देवस्वोम’ ही सरकारी अधिकार असणारी समिती आहे. या समितीने मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी ५ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांना दिले. ‘हिंदूंनी अर्पण केलेले पैसे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. ही चुकीची गोष्ट आहे’, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांना ते पैसे मंदिराला परत करावेच लागतील. याविषयी आता सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे.
६. हिंदूंनी ‘टूल किट’ (विरोधकांना शह देण्यासाठी बनवलेली यंत्रणा) बनवण्याची आवश्यकता
केरळमध्ये हिंदु धर्माच्या विरोधात चालू असलेले षड्यंत्र उत्तर भारताला माहिती नाही. त्यामुळे केरळमध्ये चाललेल्या हिंदुविरोधी कारवायांविषयी ते अनभिज्ञ रहातात. केरळमधील या कारवायांची माहिती संपूर्ण देशाला झाली पाहिजे. हा प्रश्न केवळ केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा आहे. त्यामुळे हिंदूंनीही एक ‘टूल किट’ बनवणे आवश्यक आहे.’
– श्री. राकेश नेल्लिथया, स्थापत्य अभियंता, केरळ.
श्री. राकेश नेल्लिथया यांचा परिचयश्री. राकेश नेल्लिथया हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील निवासी आहेत. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता आहेत. वर्ष २०१४ मध्ये कर्नाटकमध्ये राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान झाले होते. त्यात झालेला १ सहस्र २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला. ज्याच्या फलस्वरूप २ अधिकार्यांना निलंबित करण्यात आले. हा खटला अद्यापही चालू आहे. ते त्यांचा व्यवसाय करण्यासह धर्मरक्षणाचे कार्य आणि साधना करतात. |