अविरतपणे दुःख कोसळत असतांना आधाराच्या अदृश्य हातावर विसंबून आपत्तींना तोंड देणाराच तरणे

‘असे पुष्कळसे साधक तथा सिद्ध दिसतात की, त्यांच्यावर दुःख अविरतपणे कोसळत असते. सर्व बाजूंनी जीवनात जणू अंधार माजलेला असतो. प्रत्येक तीव्र साधकाच्या भावजीवनात असे प्रसंग सहसा आलेले आढळतात. ती एक प्रकारे ईश्वराकडून घेतली जाणारी त्यांची परीक्षाच असते; पण त्याच वेळी आधाराचा हातही अदृश्यपणे पुरवला जात असतो. साधकाला ते ओळखावे लागते आणि आधार देणार्‍या हातावर विसंबून निर्भयपणे आपत्तींना तोंड द्यावे लागते. तोच तरतो आणि काळरात्र पार करून ईशदर्शनाची पहाट अनुभवतो.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)