उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश येथील प्रकार
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश राज्यांच्या सीमेवर एक प्रसिद्ध ‘चितळ ढाबा’ आहे. लोक वर्षानुवर्षे येथे जेवणासाठी येतात; परंतु येणार्या ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हे ठाऊक नाही की, हा ढाबा मुसलमान व्यावसायिकांचा आहे. यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी मुसलमान असून येथे शुद्ध वैष्णव भोजन उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. या भागात असे अनेक ढाबे आहेत ज्यांची नावे ‘गढवाल ढाबा’, ‘जायका ढाबा’, ‘गुलशन ढाबा’, ‘अमन ढाबा’, ‘नीलकंठ ढाबा’, ‘महादेव ढाबा’ अशी आहेत; परंतु त्यांचे मालक मुसलमान असल्याचे आढळून आले आहे.
हरिद्वार-नजीबाबाद मार्गावर अनेक ढाबे असून ते मुसलमान चालवतात; मात्र त्यांचा फलकांवर हिंदूंच्या देवतांची मोठमोठी चित्रे लावण्यात आली आहेत. तसेच त्यावर ‘शुद्ध वैष्णव ढाबा’ असे लिहिले आहे. इथे ‘गुगल-पे’ किंवा ‘पेटीएम्’ने पैसे चुकते करताच त्यांचे वास्तव समोर येते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मेरठ, गजरौला, गड मुक्तेश्वर, मुंडपांडे महामार्गावर अनेक ढाबे आहेत, ज्यांच्या फलकांवर हिंदूंच्या देवतांची नावे आहेत; मात्र मालक आणि कर्मचारी मुसलमान आहेत. नुकतेच हरिद्वार देहात येथील ढाब्यामध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
संपादकीय भूमिका
|