फोंडा – श्री शांतादुर्गादेवीचा जत्रोत्सव २२ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२४ जानेवारीला दुपारी महाआरती आणि संतर्पण, रात्री पुराण, कीर्तन, आणि त्यानंतर देवीची सुखासनातून मिरवणूक, सांस्कृतिक आदी कार्यक्रम, तसेच रात्री नौकारोहणाचा कार्यक्रम झाला.
जत्रेच्या मुख्य दिवशी २५ जानेवारीला दुपारी महाआरती आणि संतर्पण सायंकाळी ७ ते पहाटे ४ वाजेपर्यंत पुराण, कीर्तन, नाटक आणि आरती अन् त्यानंतर देवीची सुवर्ण शिबिकेतून मिरवणूक आणि पहाटे ४.३० वाजता देवीची महारथातून मिरवणूक काढण्यात आली.