द्विदशकपूर्ती निमित्ताने हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !
भद्रावती (जिल्हा चंद्रपूर), ५ ऑक्टोबर – हिंदु राष्ट्राची मागणी रुजवणार्या हिंदु जनजागृती समितीला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ आरंभले आहे. हिंदु जनजागृती समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, हिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण या ध्येयपूर्तीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. या अभियानाच्या अंतर्गत संत श्री मल्हारी बाबा संस्थान, गुरुदेवनगर, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे २ ऑक्टोबर या दिवशी ‘हिंदु राष्ट्र व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सौ. दीपाली सिंगाभट्टी ‘नवरात्र आणि त्यामध्ये होणारे अपप्रकार’ यांविषयी मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘आज कायद्याचा धाक न उरल्याने महिला-भगिनींची छेड काढणे, विनयभंग, तसेच बलात्कार यांसारखे अपप्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आपल्या हिंदु भगिनींना आपण या अपप्रकारांच्या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे, तसेच आपल्या सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे अपप्रकार रोखण्यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे यांसह उत्सव मंडपात मद्यपान करणे, जुगार खेळणे,अश्लील अंगविक्षेप करत नाचणे आदी उत्सवाचे पावित्र्य नष्ट करणारे प्रकार आपण थांबवू शकतो.’’
संत श्री मल्हारी बाबा संस्थानाचे अध्यक्ष श्री. महादेव राजुरकर यांनी यासाठी साहाय्य केले.