धर्मांध एवढे भयावह आहेत की, भारतातील हिंदूही त्यांच्यापासून असुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

देहली – रियाझ आणि गियास यांनी उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल या शिवणकाम करणार्‍या हिंदूची क्रूरतेने हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करून त्या दोघांनी आनंदाने ‘आम्हीच ही हत्या केली असून प्रषित महंमद यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो’, असे सांगितले. धर्मांध एवढे भयावह आहेत की, भारतातील हिंदूही त्यांच्यापासून असुरक्षित आहेत, असे ट्वीट मूळच्या बांगलादेशच्या आणि सध्या देहलीत वास्तव्य असलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.


अन्य एका ट्वीटमध्ये तसरीन म्हणाल्या, ‘जिहाद्यांकडून केवळ मुसलमानेतरच नाही, तर सुधारणावादी मुसलमान आणि मुक्त विचार करणारे यांचाही शिरच्छेद केला जातो. धार्मिक कट्टरतावाद हा मानवतेसाठी नेहमीच हानीकारक आहे.