पत्नीच्या निधनानंतर स्थिर राहून लगेचच गुरुकार्याला प्रारंभ करणारे श्री. प्रकाश घाळी (वय ७३ वर्षे) !

डॉ. प्रकाश घाळी
सौ. सुजाता रेणके

१. सौ. अनिता घाळीकाकूंच्या निधनानंतर आम्ही त्यांचे पती श्री. प्रकाश घाळीकाका (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना भेटलो. तेव्हा ते पुष्कळ स्थिर होते.

२. मी कन्नड लिखाणाचे मराठीत भाषांतर करण्याची सेवा करते. मी केलेली सेवा काका पडताळतात. ते त्या सेवेविषयीच माझ्याशी बोलत होते.

३. थोड्या वेळाने त्यांनी ‘तुम्हाला पाणी हवे का ?’, असे आम्हाला विचारले. त्याही परिस्थितीत ते इतरांची काळजी घेत होते.

– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)


सौ. घाळीकाकूंचे अंत्यविधी झाल्यानंतर श्री. घाळीकाकांनी लगेच सेवेला प्रारंभ करणे

‘सौ. घाळी काकूंचे सर्व अंत्यविधी झाल्यानंतर त्याच दिवशी श्री. घाळी काकांनी सेवेला आरंभ केला’, असे मला वाटते; कारण मी भाषांतरित केलेली संगणकीय धारिका पडताळून १४.४.२०२२ या दिवशी रात्री १०.३० वाजता त्यांनी मला पाठवली होती. त्यावरून ‘काका किती स्थिर आहेत आणि याही स्थितीत त्यांना गुरुकार्याची किती तळमळ आहे !’, हे माझ्या लक्षात आले.

– सौ. सुजाता अशोक रेणक