परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्यातील दृश्य अद्भुत आणि अविस्मरणीय असल्याची अनुभूती घेणारे बिहार राज्यातील धर्मप्रेमी श्री. अविनाश कुलदीप

परात्पर गुरु डॉ. आठवले

भावसोहळ्याच्या दिवशीचे दृश्य अद्भुत आणि अविस्मरणीय होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सान्निध्यात सर्व लोक आणि परलोक येथील जीव होते. त्यामुळे ‘देवलोकात उत्सव चालला आहे’, असे मला वाटत होते.

१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी चरण पादुकांना स्पर्श करणे, म्हणजे जणू ते अनंत काळासाठी भेट देत आहेत’, असे वाटले. मला प्रत्येक पादुकात त्यांचे रूप दिसत होते. मला एक क्षण दिसले, ‘त्यांच्या चरणांमधून एक नदी वहात आहे.’

२. एका ध्वनीचित्र-चकतीत दाखवलेल्या ‘यज्ञाच्या वेळी सर्व आहुती परात्पर गुरुदेव स्वतःच ग्रहण करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘हवन कुंडातून एक दिव्य धारा त्यांच्या दिशेने जात आहे’, असे मला दिसले.

३. ध्वनीचित्र-चकतीत दाखवलेल्या ‘माता भवानीदेवीचे स्वागत आणि पूजन’ या कार्यक्रमात ‘परात्पर गुरुदेव भवानीमातेशी बोलत आहेत आणि भवानीमाता ईश्‍वरी राज्याची स्थापना करण्यासाठी तिच्या पुत्रांना टिळा लावायला आली आहे’, असे मला जाणवले. मला एक तेजस्वी दृश्य बघितल्याप्रमाणे वाटले. सत्संगातील प्रत्येक क्षण मला ऊर्जा देत होता. त्या वेळी मला आनंद किंवा त्रास असे काहीच जाणवत नव्हते.

४. परात्पर गुरुदेव साधकांशी संभाषण करत असतांनाची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर मला वाटले, ‘मीही त्यांच्या समवेतच बसलो आहे’; परंतु माझ्या मनात कोणताही प्रश्‍न नव्हता. सत्संगात जसजसे संभाषण होत होते, तसतशा माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत गेल्या आणि मला सर्व उत्तरे मिळाली. भावसोहळा झाल्यावर मला कोणताच प्रश्‍न नव्हता, ना कसली इच्छा होती.

५. माझ्या निवासस्थानी ‘नेटवर्क’ला नेहमी अडचण असते; मात्र या वेळी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने केवळ १ – २ वेळाच अडचण आली. ‘नेटवर्क’ बंद झाल्यावर जणू परात्पर गुरुदेवांनी स्वतःच ते चालू केले’, असे मला वाटले. यापुढे वर्णन करायला शब्दच नाहीत. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. अविनाश कुलदीप, दरभंगा, बिहार

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक