देवाची व्यापक प्रीती !

अश्‍विनी कुलकर्णी

देव आणि मनुष्य यांच्यातील भेद

​‘मनुष्याच्या जीवनात एखादा लहानसा प्रसंग घडला, तरी तो त्या प्रसंगात एवढा वहावत जातो की, भगवंतालाही विसरतो. त्याला तो प्रसंग भगवंतापेक्षाही मोठा वाटायला लागतो, म्हणजेच मनुष्याला भगवंताचे विस्मरण होण्यासाठी लहान-सहान प्रसंगही पुरेसे असतात.

याउलट देव मात्र मनुष्याचा एखादा चांगला गुण, एखादी चांगली कृती किंवा किंचितसा भक्तीभाव एवढेच पहातो आणि त्याला नित्य हाताशी धरून त्याचा योगक्षेम वहातो. हीच देवाची व्यापक प्रीती आहे.’

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२०)