६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चेंबूर, मुंबई येथील कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. गार्गी जामसांडेकर एक आहे !

(‘वर्ष २०१६ मध्ये कु. गार्गीची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)

कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर

​आषाढ कृष्ण पक्ष चतुर्थी (९.७.२०२०) या दिवशी कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. वय ४ वर्षे

१ अ. समंजस : ‘गार्गी इतर मुलांच्या समवेत खेळतांना सर्वांशी समजुतीने बोलते आणि सर्वांशी प्रेमाने वागते. त्यामुळे ती सगळ्या मुलांना आवडते.

१ आ. आजोबांचे निधन झाल्याचे गार्गीला सांगितले नसतांना तिला ते कळणे, तिने ‘आजोबा कृष्णाकडे गेले आहेत आणि कृष्णच त्यांना सांभाळेल’, असे सांगून सांत्वन करणे अन् त्यानंतर वडिलांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे कळणे : फेब्रुवारी २०१८ मध्ये माझ्या बाबांचे निधन झाले. त्या वेळी आम्ही तिघी बहिणी रडत होतो. तेव्हा गार्गी आम्हाला समजावत म्हणाली, ‘‘आजोबा कृष्णाकडे गेले आहेत आणि श्रीकृष्ण त्यांच्या समवेत आहे. तुम्ही रडू नका. कृष्ण त्यांना सांभाळेल.’’ खरेतर आम्ही तिला बाबांचे निधन झाल्याचे सांगितले नव्हते. त्यानंतर २ दिवसांनी ‘बाबांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, असे आम्हाला कळले.

​त्या वेळी गार्गी केवळ ४ वर्षांची असल्यामुळे आम्ही तिला ‘आजोबांचे निधन झाले’, असे न सांगता ‘ते रुग्णालयात आहेत’, असे सांगितले होतेे. त्यानंतर काही दिवसांनी तिने ‘आजोबा रुग्णालयातून घरी आले का ?’, असे मला विचारले. तेव्हा मी तिला ‘ते देवाघरी गेले आहेत’, असे सांगितले. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘तुम्ही मला सांगितले नाही; पण ‘आजोबा कृष्णाकडे गेले आहेत’, हे मला तेव्हाच कळले होते. मला त्यांच्याशी बोलायचे होते, ते राहूनच गेले. ते मला गोष्टी सांगणार होते. मी त्यांना सांगितले होते, ‘‘औषधे घेऊन बरे होऊन घरी या.’’

१ इ. आजीची काळजी वाटून गार्गी भावनाशील होणे : आजोबांच्या आठवणीने भावनाशील होऊन गार्गी म्हणाली, ‘‘आता आजोबा नसल्यामुळे आजी तिकडे बेळगावला घरी एकटीच असणार. ती घरी एकटी कशी रहाणार ? तिला काही हवे असेल, तर ते कोण आणून देणार ? आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊया.’’ असे म्हणून गार्गी रडू लागली.

२. वय ५ वर्षे

२ अ. नृत्याची आवड : गार्गीला नृत्य, गायन आणि चित्रकला यांची आवड आहे. तिला कथ्थक नृत्य शिकण्यासाठी शिकवणी लावली आहे. मागील दीड वर्ष ती नृत्य शिकत आहे. ‘ती फार गुणी मुलगी आहे आणि नृत्यही फार छान करते’, असे तिच्या शिक्षिका नेहमी मला सांगतात.

३. वय ६ वर्षे

३ अ. स्वावलंबी : ती स्वतःचा अभ्यास व्यवस्थित करते.

३ आ. ऐकण्याची वृत्ती : गार्गी सांगितलेले सगळे ऐकते.

३ इ. प्रेमळ

१. गार्गी सगळ्यांशी पुष्कळ प्रेमाने वागते. तिला सर्वांच्या समवेत एकत्र रहायला आवडते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती नसेल, तरी ती त्यांची आठवण काढून त्यांची विचारपूस करते.

२. तिचे प्राण्यांवर आणि झाडांवर पुष्कळ प्रेम आहे.

३ ई. आध्यात्मिक पातळी चांगली असलेल्या व्यक्ती आवडणे : तिला तिची आजी, मावशी आणि पार्थ (मावसभाऊ) हे तिघे फार आवडतात. ती सारखे या तिघांचे गुणवर्णन करत असते. तिची आजी म्हणजे माझी आई श्रीमती वंदना बाळकृष्ण चंदगडकर हिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, माझी मोठी बहीण सौ. मुग्धा उत्तम पेडणेकर हिची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे, तर कु. पार्थ (माझ्या मधल्या बहिणीचा मुलगा) याची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के आहे. ‘या तिघांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्यामुळे ते तिला अधिक आवडतात’, असे मला वाटते.

३ उ. बालसंस्कारवर्ग ऐकून तशी कृती करणे

१. ती प्रतिदिन ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग स्वतः लावते आणि पहाते. त्यात सांगितल्यानुसार ती कृती करण्याचा प्रयत्न करते, उदा. ती तिच्या वडिलांना ‘इंग्रजी चित्रपट पाहू नका. आपण आपल्या मातृभाषेत बोलणे योग्य आहे’, असे सांगते.

२. ती प्रतिदिन संध्याकाळी आमच्या समवेत नामजपाला बसते.

३ ऊ. देवाची ओढ

१. तिची अंघोळ झाली की, ती आपल्या मनाने देवाला फुले वाहून उदबत्ती लावते. ती तिला जमेल, तशी देवपूजा करते. तिला देवाच्या आणि रामायणातल्या गोष्टी पुष्कळ आवडतात. ती गीत रामायण ऐकते. ती मारुतिस्तोत्र आणि शुभंकरोति म्हणते.

२. तिची कृष्णावर फार भक्ती आहे. तिला कृष्ण फार आवडतो. ‘तो आपल्याला कधी भेटेल का ? तो भेटण्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’, असे ती मला विचारते. माझ्या मैत्रिणीने गार्गीला ‘तुला काय आवडते ?’, असे विचारल्यावर तिने ‘मला कृष्ण आवडतो’, असे सांगितले. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने उशीच्या अभ्यावर कृष्णाचे चित्र छापून तिला तो अभ्रा वाढदिवसाला भेट दिला.

३ ए. इतरांची चूक सांगणे : घरात कुणाची काही चूक झाल्यास ती लगेच सांगते.

४. स्वभावदोष

​भावनाप्रधानता, भित्रेपणा, अव्यस्थितपणा आणि आळशीपणा.’

– सौ. गायत्री जामसांडेकर (आई ), चेंबूर, मुंबई. (२२.६.२०२०)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.