‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या प्रसारकार्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना !

एप्रिल २०

सद्गुरु सिरियाक वाले

१. कोलोराडो (अमेरिका) येथे ‘असुरक्षितता ते आत्मविश्‍वासापर्यंत’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग !

​‘१.४.२०२० या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने कोलोराडो (अमेरिका) येथील ‘नरोपा युनिव्हर्सिटी’ येथे ‘असुरक्षितता ते आत्मविश्‍वासापर्यंत’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु ‘कोविड – १९’ च्या महामारीमुळे ते विश्‍वविद्यालय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे पू. (सौ.) भावना शिंदे यांनी विश्‍वविद्यालयाच्या पदाधिकार्‍यांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना ‘झूम’ व्हिडिओच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या कार्यशाळेसाठी ३३ जिज्ञासूंनी नावे नोंदवली होती.

२. कोलोराडो (अमेरिका) येथे ‘योगा ऑफ दी माईन्ड इन् डिफिकल्ट टाइम्स’ या विषयावर‘ऑनलाईन’ सत्संग

अमेरिका येथील ‘कोलोराडो स्कूल ऑफ माईन्स काऊन्सिलिंग सेंटर’ आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ मेडिटेटर्स अ‍ॅट माईन्स’ यांच्या सहयोगाने ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘योगा ऑफ दी माईन्ड इन् डिफिकल्ट टाइम्स (कठीण प्रसंगांमध्ये मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनाचा योग)’ या विषयावरील ही कार्यशाळा ६.४.२०२० या दिवशी प्रत्यक्ष कार्यस्थळी होणार होती; मात्र ‘कोविड – १९’ मुळे ती ‘झूम’ व्हिडिओच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ घेण्यात आली. पू. (सौ.) भावना शिंदे आणि कु. मेघा गांधी यांनी ही कार्यशाळा घेतली. ‘ऑर्गनाझेशन ऑफ मेडिटेटर्स अ‍ॅट माईन्स’ या संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी सदस्य आणि विद्यार्थी यांंनी त्याचा लाभ घेतला.

​कार्यशाळेत ‘कोरोना’ या महामारीच्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी मनाला स्वयंसूचना देणे कसे लाभदायी आहे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ‘राग येणे’, ‘काळजी करणे’ आणि ‘असुरक्षितेची भावना’ यांसारख्या स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी ‘अ १ आणि अ ३ या पद्धतींनी स्वयंसूचना कशा द्याव्यात ?’, हे प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर दाखवण्यात आले.

​या कार्यशाळेनंतर तेथील एक प्राध्यापक जे विद्यापिठाच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाच्या ‘परदेश शिक्षणा’चे संचालकही आहेत, त्यांनी संगणकीय पत्राच्या माध्यमातून ‘एस्.एस्.आर्.एफ्.’शी संपर्क साधला आणि या संकटकाळात शांत रहाण्यासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी वैयक्तिक मार्गदर्शन घेतले.’

मे २०२०

१. लॅटिन अमेरिका येथे स्पॅनिश भाषेत कार्यशाळा घेतली जाणे

‘१०.५.२०२० या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने सौ. सिल्विया दत्तोली आणि सौ. मायस्सम नाहस यांनी स्पॅनिश भाषेत कार्यशाळा घेतली. ‘अहं’ या विषयावर मार्गदर्शन चालू असतांना उपस्थितांनी चांगले प्रश्‍न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. स्वतःच्या ‘अहं’चे प्रकटीकरण झालेले प्रसंगही त्यांनी सांगितले. काहींनी सूक्ष्मातील प्रयोगाची योग्य उत्तरे दिली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या सत्राच्या वेळी काही जणांनी भावस्थिती अनुभवली.

२. जर्मन भाषिक प्रदेशातील कार्यशाळेत घेण्यात आलेले सूक्ष्मातील प्रयोग जिज्ञासूंना आवडणे

​१०.५.२०२० या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेली कार्यशाळा सौ. लवनिता डूर् आणि सौ. गेर्लिंडे द्रोम्ब्रोव्हस्की यांनी जर्मन भाषेत घेतली. कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व जिज्ञासूंचा सक्रीय सहभाग होता. कार्यशाळेत घेण्यात आलेले सूक्ष्मातील प्रयोग जिज्ञासूंना आवडले. एन्जिलिना या नवख्या जिज्ञासूची अंतर्मुखता चांगली होती. तिने ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याची इच्छाही व्यक्त केली.

३. अमेरिका

३ अ. ‘सिस्को वेबेक्स’ आस्थापनात व्याख्यानाचे आयोजन ! : येथील ‘सिस्को वेबेक्स’ या आस्थापनातील कर्मचार्‍यांसाठी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. १.५.२०२० या दिवशी झालेल्या या व्याख्यानाचा विषय होता, ‘कोरोना वायरस : हाऊ टु अचिव्ह अ वर्क-लाइफ फ्रॉम होम (कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटकाळात घरी राहून नोकरी आणि जीवन यांचा समतोल कसा राखाल ?)’ उपस्थितांना हे व्याख्यान पुष्कळ आवडले. ‘आठवडाभराचा ताण घालवण्यासाठी स्वयंसूचना देणे’, हा एक चांगला उपाय आहे’, असेही ते म्हणाले. या आस्थापनात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. स्वप्नजा काम करतात.

३ आ. कार्यशाळेत घेण्यात आलेल्या ‘सूक्ष्मातील प्रयोगा’च्या वेळी जिज्ञासूंची ६० ते ७० टक्के उत्तरे योग्य येणे : ३.५.२०२० या दिवशी ‘हाऊ टु रिड्युस इगो अ‍ॅण्ड अवेकन युवर सिक्स्थ सेन्स (स्वतःतील अहंकार न्यून करणे आणि सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढवणे यांच्या पद्धती)’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा पू. (सौ.) भावना शिंदे आणि सौ. क्रिस्टन हार्डी यांनी घेतली. उपस्थित जिज्ञासूंनी स्वतःच्या शंकांचे निरसन करून घेतले आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा चालू ठेवण्याविषयी विचारणा केली. कार्यशाळेत घेण्यात आलेल्या ‘सूक्ष्मातील प्रयोगा’च्या वेळी त्यांनी दिलेली ६० ते ७० टक्के उत्तरे योग्य होती. ‘लिली’ या जिज्ञासूंना सूक्ष्मातून काही प्रमाणात दिसते. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर त्यांना भावाश्रू आले.

३ इ. कार्यशाळेतील सत्रात जिज्ञासूंसाठी स्वयंसूचना देण्याचा प्रायोगिक भाग घेण्यात येणे : ३१.५.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पू. (सौ.) भावना शिंदे आणि सौ. क्रिस्टन हार्डी यांनी घेतलेल्या या कार्यशाळेचे विषय होते, ‘अपेक्षा कशा न्यून कराल ?’ आणि ‘संगीत या विषयावरील आध्यात्मिक संशोधन.’ या कार्यशाळेला २५ जिज्ञासू उपस्थित होते. ‘आमच्या जिज्ञासांविषयी आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले’, असे त्यांनी सांगितले. या सत्रात त्यांच्यासाठी स्वयंसूचना देण्याचा प्रायोगिक भागही घेण्यात आला. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने नियमितपणे ऐकायला मिळावीत, याविषयी त्यांनी विचारणाही केली.’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (जून २०२०)