आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘पंचतारांकित उपाहारगृहातील स्वयंपाकगृहात जेवण बनवणार्याला किती त्रास होतो, हे या लेखावरून स्पष्ट होते. असे असतांना ते जेवण जेवणार्यांना किती त्रास होत असेल, याची कल्पना करता येत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. उपहारगृह आणि रामनाथी आश्रम येथील स्वयंपाकगृहात सेवा करतांना लक्षात आलेले भेद
अनुभूती
अ. ‘उपाहारगृह आणि आश्रम यांतील स्वयंपाकघर यांच्यातील भेद’ हे लिखाण करतांना गुरुदेवांनी दिलेले पेन अन् सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दिलेली दैनंदिनी यांचा उपयोग केल्यामुळे लिहितांना अनेक न आठवणारी सूत्रेही आठवू लागली.
आ. उपाहारगृहात एकाच भांड्यात शाकाहारी आणि मांसाहारी जेवण बनवतात, हे सूत्र लिहितांना मला ते भांडे दिसले. मांसाहार शिजवलेल्या भांड्याच्या तळाला त्रासदायक शक्ती वर्तुळात एकत्रित होऊन ‘निर्माण झालेली त्रासदायक शक्ती भांड्याच्या कडांमधून वातावरणात फेकली जात आहे’, असे दिसले.
‘देवा, हे लिहिण्यास तूच बुद्धी दिलीस आणि लिहून घेतलेस, ते तुझ्याच चरणी अर्पण करतो. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी अनुभूती दिली; म्हणून त्यांच्या चरणी अनन्य कृतज्ञता !’
– श्री. ऋत्विज ढवण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०१९)