
कोल्हापूर – पेट्रोल, डिझेल, सिलिंडर दरवाढ, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईच्या विरोधात ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली उंचगाव येथील राज्य महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. या वेळी गॅस सिलिंडरला प्रतिकात्मक हार घालण्यात आला. या प्रसंगी राजू यादव म्हणाले, ‘‘सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. तरी केंद्र सरकारने तात्काळ दर कपात करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.’’
या प्रसंगी पोपट दांगट, विशाल देवकुळे, राजू सांगावकर, राहुल गिरूले, बाळासाहेब नलवडे, दीपपक गौड, योगेश लोहार, सचिन नागटिळक यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !