सार्जंट कु. शौर्या शिंदे हिला ‘राष्ट्रीय छात्र सेने’चा उत्कृष्ट ‘कॅडेट’ पुरस्कार !

कु. शौर्या शिंदे हिला पुरस्कार प्रदान करतांना कर्नल विक्रम नलवडे, तसेच अन्य


कोल्हापूर –
उंचगाव येथे रहाणार्‍या सार्जंट (सैन्यदलातील पद) कु. शौर्या अश्विन शिंदे (वय १४ वर्षे) हिला ‘राष्ट्रीय छात्र सेने’चा (एन्.सी.सी.चा) उत्कृष्ट ‘कॅडेट’ (प्रशिक्षणार्थी सैनिक) पुरस्कार मिळाला आहे. कु. शौर्या ही ताराराणी विद्यापिठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून कोल्हापूर ग्रुपच्या ‘०६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन’ची ‘राष्ट्रीय छात्र सेने’ची कॅडेट आहे.

नुकतेच राष्ट्रीय छात्र भवन येथे झालेल्या कार्यक्रमात कर्नल विक्रम नलवडे यांच्या हस्ते तिला रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शौर्या ही करवीर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची पुतणी आहे. कु. शौर्या शिंदे हिचे आई-वडील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत.