पोलिसांच्या छळामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण

धारवाड (कर्नाटक) – शहर पोलिसांच्या छळाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणी विद्यागिरीचे पोलीस निरीक्षक महंमद रफीक तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी यापूर्वी ३ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले होते. आदित्य म्यागेरी नावाच्या पदवीधर विद्यार्थ्याला अमली पदार्थ (गांजा) प्रकरणात १ दिवस पोलीस ठाण्यात बसवून त्याच्या मनात नाहक भीती निर्माण करण्यात आली होती, तसेच त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप होता. यामुळे नैराश्य आल्याने आदित्य म्यागेरी याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलीस आयुक्त एन्. शशिकुमार यांनी ३ पोलीस कर्मचार्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला होता. केवळ कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्यांना निलंबित करणे पुरेसे नाही, तर वरिष्ठ अधिकार्यांनाही शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी चोहोबाजूंनी होत होती. कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते अरविंद बेल्लद यांनी विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याची नोंद घेत पोलीस आयुक्त शशिकुमार यांनी आता विद्यागिरीचे पोलीस निरीक्षक महंमद रफीक तहसीलदार यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून निलंबित करण्याचा आदेश दिला.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !