विकास लवांडे यांच्याविरुद्ध पंढरपूर येथे गुन्हा नोंद !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे

पंढरपूर – वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील मान्यवर महाराज यांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँगे्रस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याविरुद्ध पंढरपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात वारकरी प्रतिनिधींच्या वतीने पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती.

‘वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अभ्यासू मान्यवरांचा ‘घुसखोर’ असा उल्लेख करणे, या सर्वांविषयी समाजमनामध्ये संभ्रम निर्माण करणे, भक्तगणांच्या भावना दुखावणे, या सर्वांची अपकीर्ती करून वारकरी संप्रदायाची हानी करणे आणि समाजात जातीभेद पसरवून वाद उत्पन्न करणे, असे असल्याने विकास लवांडे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून यामागील सूत्रधार शोधावेत. तसेच हे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत लवांडे यांना पोलिसांच्या कह्यात ठेवावे’, अशी मागणी वारकर्‍यांच्या वतीने तक्रारीत करण्यात आली आहे.