मोनालिसा हिने मुसलमान प्रियकराशी विवाह केल्यावर चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचा दावा !

थिरूवनंतपूरम् (केरलम्) – प्रयागराज येथील गेल्या वर्षी झालेल्या महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष विकणारी तरुणी मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली होती. तिला चित्रपटात अभिनय करण्याचीही यानंतर संधी मिळाली. आता तिने कुटुंबियांचा विरोध झुगारून केरलम्मध्ये तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केला. मोनालिसाने पोलीस संरक्षणात न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर मंदिरातही विवाह केला. मोनालिसाच्या या विवाहामुळे तिला चित्रपटात काम देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी टीका करत ‘मोनालिसा ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली’, असा दावा केला. सनोज मिश्रा यांच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
सनोज मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे, हा लव्ह जिहाद आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस आहे. तिचे नैसर्गिक सौंदर्य मला आवडले होते; म्हणून मी तिला अभिनेत्री बनवण्याची घोषणा केली. यानंतर संपूर्ण जगाने तिचे स्वागत केले; पण हे माझ्या विरोधकांना आवडले नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करून मला कारागृहात पाठवले. मी कारागृहात असतांना चित्रपटाची कथा लिहिली. अनेक जण म्हणत होते की, सनोज मिश्रा कधीच चित्रपट बनवू शकणार नाही. पण मी चित्रपट पूर्ण करून त्यांना उत्तर दिले. मोनालिसाचे आयुष्य इतके सोपे नव्हते. तिची खरी आई वेगळी रहात होती आणि ती गरिबीत जगत होती. अनेकदा मोनालिसाने मला तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या होत्या. एक दिवस तिने आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे मला योग्य वाटले नाही. मोनालिसाला आज तिचे हे पाऊल ‘बंड’ वाटत असेल; पण हा ‘लव्ह जिहाद’ आहे आणि ती याची बळी ठरली आहे.
पुढे मिश्रा यांनी आरोप केला की, मोनालिसाला शिकवण्यासाठी त्यांनी ठेवलेला शिक्षक नंतर तिचा व्यवस्थापक बनला आणि त्यानेच तिला चुकीच्या लोकांच्या संपर्कात आणले. त्यानेच तिला आणि समाजाला माझ्याविरुद्ध भडकवले होते.
आमचे लग्न ‘लव्ह जिहाद’ नाही ! – मोनालिसाचे स्पष्टीकरण
मोनालिसा भोसले आणि पती फरमान खान यांनी विवाहानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी मोनालिसाने स्पष्ट केले की, आमचे लग्न हिंदु पद्धतीने झाले आहे. खरे तर त्याला माझ्याशी लग्नच करायचे नव्हते; पण मीच बलपूर्वक त्याच्याशी लग्न केले. माझे वडील माझे लग्न दुसर्याशीच लावून देणार होते; पण मला तो मुलगा पसंत नव्हता. तो माझ्या आत्याचाच मुलगा होता. आत्याचा मुलगा म्हणजे माझा भाऊ झाला. म्हणून मी त्याच्याशी लग्नाला नकार दिला. मी हिंदु पद्धतीप्रमाणे लग्न केले आहे. सगळे जे लव्ह जिहाद बोलत आहेत, तसे काहीच नाही. आम्ही कलाकार आहोत. आमच्यासाठी सर्व धर्म एकच आहे. मी सगळ्या धर्माला एक मानते.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !