ऑक्टोबरच्या शेवटी गगनयान मोहिमेची चाचणी

या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे.

सूर्याच्या दिशेने झेपावणार्‍या ‘आदित्य एल् – १’ने ९.२ लाख किमीचे महत्त्वाचे अंतर केले पार !

‘आदित्य एल्-१’ने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकणारे भारताचे हे दुसरेच अवकाशयान आहे.

६ ऑक्टोबरपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ जागे होण्याची प्रतीक्षा करू ! – इस्रो

चंद्रयान-३चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरल्यानंतर १४ दिवस त्यांनी तेथील माहिती पाठवली. १४ दिवसांनी तेथे त्यापुढील १४ दिवसांसाठी सूर्य मावळल्याने अंधार झाला. या काळात येथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे काम इस्रोकडून बंद करण्यात आले होते.

भारत अवकाशात जगातील तिसरे अंतराळ स्थानक उभारणार !

भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे निधन

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्‍या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.

‘इस्रो’ने चंद्रवरील ‘विक्रम’ लँडर काही सेंटीमीटर वर उडवून पुन्हा सुखरूप खाली उतरवले !

भविष्यातील मोहिमेच्या उद्देशाने केलेला प्रयोग यशस्वी !

‘आदित्य एल्-१’ बनवण्यात आलेल्या ठिकाणी अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पट अधिक स्वच्छता होती !

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद !