कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

काही दिवसांपासून मी भावाच्या स्तरावर प्रयत्न करत आहे. एकदा मी ‘परात्पर गुरुदेव माझ्या हृदयातच आहेत आणि ते माझ्याकडे पहात आहेत’, असा भाव ठेवला. त्या दिवसापासून मला चांगले वाटू लागले. मी परात्पर गुरुदेवांना प्रत्येक कृतीमधून अनुभवू लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित ३ शोधनिबंध मार्च २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सर्व शोधनिबंधांचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तर सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आहेत.

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ?

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेद्वारे व्यसनाधीनतेवर अल्पावधीत मात करता येते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

आध्यात्मिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यसनांची ३० टक्के कारणे शारीरिक असतात, तर ३० टक्के मानसिक आणि ४० टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर अल्पावधीत मात करता येते.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !

सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात.

‘मी गुरुसेवा करत आहे’, असा भाव असला, तर समष्टी साधना चांगली होऊन त्याबरोबर व्यष्टी साधनाही होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी गुरुसेवा करत आहे’, असा भाव असला, तर समष्टी साधना चांगली होऊन त्याबरोबर व्यष्टी साधनाही होते ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !

छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा.

देशाचे वाटोळे होण्यामागील कारण !

‘लोकशाहीला जात्यंध आणि भ्रष्टाचारी जनता लायक नसल्याने देशाचे वाटोळे झाले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्वसाधारण व्यक्ती आणि संत यांच्या रागावण्यातील फरक !

‘सर्वसाधारण व्यक्ती रागवते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’