जळगाव जिल्ह्यातील रथोत्सव !

जळगाव जिल्ह्यात आश्विन आणि मार्गशीर्ष मासामध्ये अनेक रथोत्सव पार पडतात. या रथोत्सवांना शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. रथोत्सवाचा हा दैदिप्यमान सोहळा पाहून भाविक भक्तीरसात डुंबून जातात. भक्त रथाला दोरखंडाच्या साहाय्याने ओढून मार्गक्रमण करतात.

जगमान्य भारतीय शिक्षणपद्धत !

ब्रिटनमधील शिक्षणक्षेत्राच्या केंद्रस्थानी वर्ष १८५६ पासून असलेल्या ‘वेलिंग्टन कॉलेज युके’च्या वतीने भारतातील पहिली शाळा पुण्यात चालू करण्यात येत आहे.

अधिकारी पदावर योग्य व्यक्तीच हवी !

महत्त्वाच्या पदावर भ्रष्ट आणि मनमानी कारभार करणारी व्यक्ती अधिकारी म्हणून रहाणे घातक आहे. शिक्षण विभागात इतरांची गळचेपी होणार नाही, याची काळजी घेणारा अधिकारी त्या पदावर असायला हवा.

शाकाहार आणि सात्त्विकता !

मांसाहाराची सवय आहे; पण तो सोडून शाकाहारी होण्याची प्रबळ इच्छा असल्यास त्यासाठी प्रयत्नपूर्वक, टप्प्याटप्प्याने शाकाहाराकडे वळले पाहिजे. यामुळे सात्त्विक विचार-आचार म्हणजे नेमके काय ? यांची अनुभूती घेता येईल. यात अशक्य असे काहीच नाही. केवळ मनाची सिद्धता महत्त्वाची आहे.

‘सेन्सॉर बोर्डा’मध्ये धार्मिक प्रतिनिधी हवेत !

प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी समिती, फेरविचार समिती आणि अपिलीय समिती अशा ३ समित्या कार्यरत असतात. तरीही अश्लील चित्रीकरण अन् आक्षेपार्ह संवाद चित्रपटात कसे काय रहातात ? ते का वगळले जात नाहीत ? कि चित्रपट निर्माते आणि ‘सेन्सॉर बोर्ड’ यांच्यात काही साटेलोटे असते ?

वारसास्थळांना पुनरुज्जीवन कधी ?

पुरातत्व विभाग सक्षम आणि समाजाभिमुख झाला, तरच अधिकाधिक वारसास्थळांना पुनरुज्जीवन मिळेल, ऐतिहासिक वास्तूंचा नुसता अभिमान बाळगून उपयोग नाही, तर त्या वास्तू टिकवण्यासाठी, पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्याला जपण्याचे दायित्वही आपलेच आहे.

रस्ते अपघाताची कारणमीमांसा !

रस्ते अपघातांमध्ये खड्ड्यांसमवेत वाहने सुसाट वेगाने चालवणे, महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, ही कारणेही आहेत. रात्रीच्या वेळी बर्‍यादा ट्रकचालक, तसेच प्रवासी वाहतूक करणारे चालक हे मद्य पिऊन वाहने चालवतांना आढळतात.

घनकचरा व्यवस्थापन ?

पर्यावरण प्रदूषणाच्या समस्यांशी चालू असलेला लढा सुजाण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकनियुक्त प्रतिनिधी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार, सफाई कामगार आणि स्थानिक स्तरावर कार्यरत सामाजिक संस्था या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनीच जिंकता येणे शक्य आहे.

तरुण बंदीवान कशामुळे झाले ?

एकत्रित कुटुंबपद्धत लोप पावत चालल्याने लहानपणापासून मुलांवर होणारे संस्कार अल्प झालेले आहेत. एकूणच तरुणांची झालेली बिकट स्थिती सावरण्यासाठी त्यांना गुरुकुल शिक्षणपद्धतीचे शिक्षण देणे आणि त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी तशी व्यवस्थाच सरकारने निर्माण करायला हवी.

‘विशेष अन्वेषण पथका’ची स्थापना – एक सोपस्कार ?

गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक मंदिरांतील मूर्ती चोरीला गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत; मात्र पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे यापुढे हिंदूंनीच मूर्ती चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरट्यांना कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा करावा !