केरळमधील साम्‍यवादी सरकारचे मोगलप्रेम जाणा !

केरळच्‍या एस्.सी.ई.आर्.टी.च्‍या ११ वी आणि १२ वीच्‍या इसिहास अन् राज्‍यशास्‍त्र या पुस्‍तकांमध्‍ये एन्.सी.ई.आर्.टी.ने काढून टाकलेल्‍या मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या धड्यांचा समावेश करण्‍यात येणार.

काँग्रेसची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

पाकिस्‍तानमधून भारतात आलेल्‍या शरणार्थी हिंदूंची राजस्‍थानमधील जोधपूर येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्‍हणणे आहे की, ही भूमी त्‍यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते.

भारत सरकारने याकडे लक्ष द्यावे !

गेल्‍या काही दिवसांपासून श्रीलंकेतील हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असल्‍याच्‍या घटना घडत आहेत. देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड आणि मूर्ती गायब होण्‍याचे प्रकार वाढले आहेत.

असे संपूर्ण भारतात कधी होणार ?

उत्तरप्रदेश राज्‍यात कुठेही रस्‍ता बंद करून ईदचे नमाजपठण करण्‍यात आलेले नाही. वाहतूक रोखण्‍यात आलेली नाही. याचे कारण राज्‍यात कायद्याचे राज्‍य असून ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले.

तिरुपती मंदिराच्या दर्शनात मुसलमान आमदाराचा घोटाळा जाणा !

तिरुपती देवस्थानाच्या दर्शन तिकिटांमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी  आंध्रप्रदेशातील आमदार शेख साबजी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी ६ भक्तांकडून दर्शनासाठी ५०० रुपयांऐवजी प्रत्येकी १ लाख रुपये गोळा केले होते.

इस्लामी देशांनी तेथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी बोलावे !

इस्लामी देश बहरीनच्या संसदेत ‘अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत हिंदु अतिरेक्यांनी हत्या केली’, असा आरोप करण्यात आला. 

मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

उत्तरदायींना कारागृहात डांबा !

हत्‍या करण्‍यात आलेला कुख्‍यात गुंड अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्‍या समर्थनार्थ माजलगाव (जिल्‍हा बीड) येथील चौकात लावण्‍यात आलेल्‍या फलकांवर त्‍यांना ‘हुतात्‍मा’ म्‍हटले होते.

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती जाणा !

पाकमध्‍ये वर्ष २०२१ च्‍या तुलनेत वर्ष २०२२ मध्‍ये हिंदूंच्‍या मंदिरांच्‍या तोडफोडीच्‍या घटना दुप्‍पट झाल्‍याचे पाकिस्‍तानच्‍या मानवाधिकार आयोगाच्‍या अहवालात दिसून आले आहे.

अशा खलिस्तान्यांवर कारवाई करा !

एका युवयुतीने चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने सुवर्ण मंदिराबाहेरील अधिकारी तिला आत जाण्यापासून सू रोखत ‘हा पंजाब असतांना तुम्तुही भारताचा राष्ट्रध्वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्न विचारल्याची घटना समोर आली आहे.