मृत्यू मला म्हणाला,
‘येऊ का मी तुम्हाला भेटायला’ ।
मी म्हणालो त्याला,
‘ये बाबा, आनंदाने भेटायला’ ।। १ ।।
नव्हते ठाऊक बिचार्या
अज्ञानी मृत्यूला ।
तो केवळ भेटू शकतो
माझ्या शरिराला ।। २ ।।
मला भेटणे कदापि शक्य नाही त्याला ।
मला भेटण्याच्या नादात मृत्यूचा मृत्यू झाला ।। ३ ।।
‘अमृत अवस्था’ हेची अमृत प्राशन ।
अमृतस्य पुत्रः अमृतस्य स्वरूपः (टीप) ।। ४ ।।
टीप : मी अमृताचा पुत्र असून अमृत हेच माझे स्वरूप आहे.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (३१.१०.२०२३)