(‘कुर्बानी’ म्हणजे ईदनिमित्त मांसासाठी केली जाणारी हत्या)
फोंडा, १९ जून (वार्ता.) – ‘बकरी ईद’च्या निमित्ताने १७ जून या दिवशी म्हारवासडा, उसगाव येथे गोवा मांस प्रकल्पात २०० म्हशींची ‘कुर्बानी’ देण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकारी अश्विन चंद्रू यांच्या आदेशानुसार प्रकल्प परिसरात १९ जून या दिवशी मध्यरात्रीपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खास पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. ‘कुर्बानी’च्या वेळी कुणी अडसर आणून अशांतता निर्माण करू नये, यासाठी हा आदेश देण्यात आला होता.
या दिवशी गोवा मांस प्रकल्पाच्या संचालिका डॉ. वीणा कुमार, उपसंचालक डॉ. प्रकाश कोरगावकर यांनी गोवा मांस प्रकल्पाला भेट देऊन ‘कुर्बानी’साठी आणलेल्या म्हशींच्या कायदेशीर सोपस्काराची पहाणी केली. मांसाच्या वाहतुकीसाठी प्रकल्पाची आणि मुसलमानांची वाहने सज्ज ठेवण्यात आली होती. प्रतिवर्ष मांस प्रकल्पात १०७ ते १३० म्हशींची ‘कुर्बानी’ दिली जात असे, तर यंदा २०० म्हशींची कुर्बानी देण्यात आली. कर्नाटक येथून कुर्बानीसाठी आणखी म्हशी आणण्याचे प्रकल्प प्रशासनाचे नियोजन होते; मात्र याला विरोध होण्याची शक्यता असल्याने आणखी म्हशी आणण्यात आल्या नाहीत.
संपादकीय भूमिकाप्रतिदिन खाण्यासाठी आणि ईदनिमित्त कुर्बानीसाठी गुरे लागतात, तर मुसलमान गोठे उभारून गुरे का पाळत नाहीत ? हिंदूंची रस्त्यावर मोकाट फिरणारी किंवा कुणाच्या तरी गोठ्यातील गुरे पळवायची आणि त्यांची हत्या करून मांस खायचे असे त्यांच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे का ? |