श्रीकृष्‍णाच्‍या कृपेने ‘६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या साधिका सुश्री मधुरा भोसले या एक ऋषिकन्‍या आहेत’, असा विचार साधिकेच्‍या मनात येणे

‘२९.१.२०२४ या दिवशी माझ्‍या मनात विचार आला की, सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेने सुश्री मधुरा भोसले या सर्वांचे सूक्ष्म परीक्षण करतात, तर ‘मधुराताई स्‍वतः कोण आहेत ?’ याविषयीसुद्धा सूक्ष्म परीक्षण करायला पाहिजे. हा विचार मनात आल्‍यानंतर श्रीकृष्‍णाने मला पुढील विचार दिले.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘मधुराताई एक ऋषिकन्‍या आहेत’, असा विचार मनात येणे

‘वर्ष २०१२ पासून गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मला पूर्णवेळ सेवा करण्‍याची संधी मिळाली आणि तेव्‍हापासून माझा मधुराताईंशी परिचय आहे. जेव्‍हा जेव्‍हा मला मधुराताई भेटतात, तेव्‍हा त्‍या देवी अनसूयेसारख्‍या दिसतात. मधुराताईंनी कोणत्‍याही रंगांची वस्‍त्रे परिधान केली असली, तरी ‘सूक्ष्मातून ताईंनी भगवी वस्‍त्रे परिधान केली आहेत’, असे मला दिसते. माझ्‍या मनात ‘मधुराताई एक ऋषिकन्‍या आहेत’, असा विचार येतो.

कु. पूनम चौधरी

(‘मला वर्ष २००५ पासून ‘मी ऋषिकन्‍या आहे आणि मला ऋषींच्‍या आश्रमात रहायचे आहे’, असे वाटत होते. त्‍यामुळे मी वर्ष २००५ मध्‍ये माझे शिक्षण पूर्ण झाल्‍याबरोबर माझे घर सोडून आई-बाबांच्‍या अनुमतीने रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात निघून आले.’ – सुश्री मधुरा भोसले (६.३.२०२४))

२. ‘मधुराताईची खोली म्‍हणजे एक उपवन आहे’, असे जाणवणे

२९.१.२०२४ या दिवशी मी मधुराताईंला भेटायला गेले होते. तेव्‍हा मला त्‍यांच्‍या खोलीत पिवळा प्रकाश दिसत होता. ‘ताईंच्‍या खोलीत अन्‍य साहित्‍य न दिसता ती खोली म्‍हणजे एक उपवन आहे’, असे मला जाणवत होते.

३. गुरुदेवांच्‍या कृपेने ‘मधुराताईंची सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमता किती अधिक आहे’, त्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती !

मे २०२३ मध्‍ये मी देहली सेवाकेंद्रात होते. एक दिवस मला मधुराताईंची पुष्‍कळ आठवण येत होती; परंतु माझ्‍याकडे त्‍यांचा भ्रमणभाष क्रमांक नव्‍हता. थोड्या वेळानंतर पाहिले, तर ‘मी कशी आहे ?’, हे विचारण्‍यासाठी मला मधुराताईंचाच लघुसंदेश आला होता. ते पाहून मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली आणि माझी भावजागृती झाली; कारण गुरुदेवांनी आम्‍हाला सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता असणारे अलौकिक साधक दिले आहेत.

‘गुरुदेवा, आपल्‍याच कृपेने माझ्‍या मनात हा विचार आला आणि आपणच माझ्‍याकडून सर्व लिहून घेतलेत. अशा गुरुदेवांच्‍या परम दिव्‍य श्रीचरणी मी सर्वस्‍व अर्पण करते.’

– गुरुकन्‍या,

कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक