१. ‘आश्रमातील खोलीत बसल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि थोड्या वेळातच माझे ध्यान लागले. माझ्या आज्ञा आणि सहस्रार या चक्रांच्या ठिकाणी मला हालचाल जाणवली.
२. आश्रमात वावरतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले.
३. एका सत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांकडे पाहिल्यावर ‘मला चैतन्य मिळत असून माझी दृष्ट निघत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या देहावर आलेले अनिष्ट शक्तींचे आवरण न्यून झाले.’
– श्री. प्रशांत नारायण पाटील, कोथरूड, पुणे. (६.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |