श्रीनगर – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणारा मुसलमान धर्मगुरु आदिल गफूर गनी याला पोलिसांनी अटक केली. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भद्रवाह येथे आदिल गफूर याने नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचे मुसलमानांना आवाहन केले होते. यानंतर भद्रवाहमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली.
#Jammu cleric arrested for threatening to behead #NupurSharma, making anti-Hindu remarkshttps://t.co/vucO47hDQg
— TIMES NOW (@TimesNow) June 12, 2022
याआधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ११ जून या दिवशी यूट्यूबर फैजल वानी यालाही अटक केली. त्यानेही नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याचा व्हिडिओ बनवला आहे.