देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्रांहून अधिक नवे रुग्ण  

नवी देहली – देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्र २५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ जून या दिवशी १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ सहस्र ६१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात २२ सहस्र ६९१ कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत.