कुटुंबियांच्या विरोधामुळे आईने ‘सेवेसाठी बाहेर जायचे नाही’, असे सांगितल्यावर तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होऊन ‘मी वर्षाची सर्व काळजी घेतो’, असे सांगितल्याची अनुभूती येणे

कु. वर्षा जबडे

​‘मी रामनामी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी येण्यापूर्वी अकलूज, सोलापूर येथे घरी राहून साधना करत होते. मला सेवेसाठी बाहेर जायचे असल्यास माझी आई (कै. (सौ.) वैजयंती जबडे) मला साहाय्य करायची. साहाय्य केल्यावर तिला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन व्हायचे. काही वेळा मला सेवेसाठी घराबाहेर जाण्यास घरातील व्यक्तींकडून विरोध व्हायचा. त्या वेळी आई त्यांचा विरोध न्यून होईपर्यंत काही दिवस मला सेवेसाठी बाहेर जाऊ देत नसे.

एकदा मला घरातील व्यक्तींकडून तीव्र विरोध झाला. त्या वेळी मात्र आईने मला ‘आता सेवेला कधीच बाहेर जायचे नाही’, असे सांगितले. त्या क्षणी आईला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. ते आईला (सूक्ष्मातून) म्हणाले, ‘तुम्ही वर्षाची काळजी करू नका. मी तिची सर्व काळजी घेतो.’ तेव्हापासून कुटुंबियांचा विरोध झाला, तरी आईने मला सेवेला बाहेर जाण्यास विरोध केला नाही.’

– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक