सेन्सेक्समध्ये चौथ्या दिवशी ७४०.१९ अंकांची घसरण

सेन्सेक्समध्ये घसरण

मुंबई – गेल्या ३ दिवसांपासून जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे समभाग विक्री वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात २५ मार्चला चौथ्या दिवशी सेन्सेक्स ७४०.१९ अंकांनी कोसळला. २४ मार्चलाही सेन्सेक्स ८७१ अंकांंनी कोसळला होता. त्यामुळे निर्देशांक ४८४४०.१२ वर बंद झाला. सातत्याने होणार्‍या घसरणीविषयीची कारणे सांगतांना तज्ञांनी देशभरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, हे एक प्रमुख कारण सांगितले आहे.

सरकारने कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. आता ४५ वर्षे वयावरील व्यक्तींनाही कोरोनाची लस दिली जाणार आहे. असे असले तरी या उपाययोजनांपेक्षा वाढत्या रुग्णसंख्येचा शेअर बाजारावर मोठा प्रभाव पडला असल्याचे दिसून येते.