२ चारचाकी वाहनांसह आंतरराज्य टोळीतील ७ आरोपींना अटक

बारामती – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणार्या टोळीला अटक केली. या कारवाईत ६१२ किलो गांजा, २ चारचाकी वाहने आणि इतर साहित्य असा ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ आरोपींना अटक केली.
गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी पाठलाग करत एका ‘इनोव्हा’ गाडीतून १३४ किलो गांजा जप्त केला. फलटण रस्त्यावर दुसर्या वाहनाचा पाठलाग केला. पकडलेल्या ‘इनोव्हा’ गाडीतून २३ किलो गांजा जप्त केला. अन्वेषणाच्या वेळी पोलिसांनी सापळा रचून आरोपींना कह्यात घेतले. आरोपींकडे ४७८ किलो गांजा मिळाला. या कारवाईत बारामती, सांगली इतर भागांमध्येही समन्वय साधत धाडसत्र राबवले.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली