
सावंतवाडी – ‘आता मला पुढे शिकायचे नाही’, असे सांगत ३१ मार्च या दिवशी शहरातील एका महाविद्यालयीन मुलाने घराच्या गच्चीतून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर २ एप्रिल या दिवशी दुपारी बिरोडकर टेंब येथे एका अल्पवयीन मुलीने घरी गळफास घेतल्याचे समजताच तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यामागील कारण समजू शकलेले नाही. ही घटना ताजी असतांनाच दुर्दैवाने बिरोडकर टेंब येथील याच मुलीच्या भावाने जंगलमय भागात आत्महत्या केल्याचे २ एप्रिलच्या सायंकाळी उघडकीस आले. आत्महत्यांच्या सलग ३ घटनांमुळे खळबळ उडाली आहे.\
संपादकीय भूमिकाकेवळ भौतिक विकास म्हणजे सर्वकाही या भ्रमात न रहाता जीवनात निर्माण होणार्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचे धैर्य जनतेमध्ये निर्माण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या वाढत्या प्रकारांतून राज्यकर्त्यांनी हे सूत्र लक्षात घेऊन जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. |
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली