‘जागतिक महिलादिना’चे औचित्य

कोची (केरळम्) : ८ मार्च या ‘जागतिक महिलादिना’चे औचित्य साधत ‘मानव सेवा समिती ट्रस्ट’च्या वतीने केरळम्मधील एळमक्करा (जिल्हा एर्नाकुलम्) येथील सनातनच्या साधिका श्रीमती विजया कुमारी यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती विजया कुमारी या अंगणवाडीच्या अध्यापिका आहेत आणि त्या ‘मतदान केंद्रस्तराच्या अधिकारी’ही आहेत. त्या समाजातील अनेकांना निःस्वार्थी भावाने साहाय्य करतात. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी त्यांचा ‘मानव सेवा समिती ट्रस्ट’च्या वतीने श्रीमती विजया कुमारी यांच्या निवासस्थानी शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर श्रीमती विजया कुमारी म्हणाल्या, ‘‘मी जे काही करते, ते केवळ गुरूंच्या कृपेमुळे होत असते. त्यामुळे हा सत्कार मी त्यांच्या चरणी समर्पित करते.’’
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण