भारतीय ऋषींना सहस्रो वर्षांपूर्वी समजलेले पाण्याचे महत्त्व जपानी शास्त्रज्ञांना आता उकलणे, हा विज्ञानाचा थिटेपणा !

‘सहस्रो वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथांत सांगितलेल्या जलविषयक सूत्राला पूरक असे संशोधन जपानच्या शास्त्रज्ञांनी आता केले आहे. त्यानुसार ‘समाजाच्या एखाद्या क्रियेला जल प्रतिसाद देऊ शकते आणि स्वतःची पसंती दर्शवू शकते’, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या संशोधनामुळे, ‘जल हे सजिवांची निर्मिती करणारे मूळ रसायन आहे’, हा भारतीय ऋषींनी अनंत कालापूर्वी मांडलेला सिद्धांत आणि ‘जल अशुद्ध अथवा अपवित्र करू नये’, असे सांगून वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे आदी ग्रंथांतून झालेले प्रबोधन, यांना आता वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण मिळाले आहे.’

– डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, निवृत्त प्राध्यापक, आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर. (‘मासिक धर्मभास्कर’, सप्टेंबर २००७)