विज्ञानाची मर्यादा !

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुन्हेगारी‍वर आळा घालण्यासाठी साधना अपरिहार्य !

‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गेल्या १ सहस्र वर्षांपासून हिंदूंची स्थिती दयनीयच !

‘प्रथम मुसलमान, नंतर इंग्रज यांनी हिंदूंची दयनीय स्थिती केली आणि आता बहुतांश राजकीय पक्ष हिंदूंची स्थिती दयनीय करत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

आपल्याला मिळालेली सेवा छोटी किंवा मोठी याचा विचार न करता, ‘मनानुसार सेवा हवी’, अशी अपेक्षा न ठेवता, आहे ती परिस्थिती स्वीकारून समष्टीच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, म्हणजे रथोत्सवात श्री गुरूंचा रथ ओढण्याची सेवा करणे.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे योगी आहेत. त्यांच्या मुखातून योग्य वेळी ‘हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन येईल.

यज्ञाला विरोध करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्‍या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना अभ्यासाच्या अभावी कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !

‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 आनंदी, हसतमुख, सकारात्‍मक आणि शिकण्‍याची वृत्ती असलेला अमरावती येथील श्री. महेश चौधरी !

मनमोकळेपणाने बोलणे, निरागसता, अहं अल्‍प असणे, इतरांना साहाय्‍य करणे, योग्‍य दृष्‍टीकोन असणे, परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे, सकारात्‍मकता असे गुण मला महेश चौधरीच्‍यामध्‍ये जाणवले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञान मिळवण्‍याच्‍या सेवेविषयी श्री. राम होनप यांना दिलेला आशीर्वाद !

विविध विषयांवर मिळत असलेल्‍या सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन मी संगणकीय धारिकांमध्‍ये करत होतो. या धारिका परात्‍पर गुरु डॉक्‍टर पडताळायचे. हे सूक्ष्म ज्ञान आवडत असल्‍याने ते प्रत्‍येक धारिकेवर ‘आवडले’, असा शेरा द्यायचे.